भुसावळ विभागात बाल दिनानिमित्त विविध कार्यक्रम

बाल दिन उत्साहात : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


भुसावळ : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहर व विभागातील शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पं.नेहरू यांच्या कार्याला मान्यवरांनी मनोगतातून उजाळा दिला.

ताप्ती पब्लिक स्कूल
भुसावळ : ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस प्राचार्य निना कटलर यांनी माल्यार्पण केले. नर्सरी ते दहावीच्या शिक्षक वृंदांनी समूह नृत्य सादर केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी मीना बाजारचे आयोजन करण्यात आले. विविध प्रकारचे खेळ, व खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. सूत्रसंचालन श्रद्धाली घुले व भारती मेढे यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.



दादासाहेब नामदेव भोळे विद्यालय
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन म्हणून साजरा करण्यात आली. माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.राजू फालक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, डॉ.माधुरी पाटील, डॉ.बी.ए बेंडाळे, डॉ.डी.एस.राणे, प्रा.ए.आर.सावळे, प्रा.ए.जी.नेमाडे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एन.एस.वानखेडे, प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.संजय चौधरी, विजय पाटील उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ.एस.डी.चौधरी कळवतात.

यावल महाविद्यालय
यावल :
ज.जि.म.वि.प्र.सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पंडित नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अर्जुन पाटील होते. प्रमुख पाहुण्यांचा परीचय प्रा.गणेश जाधव यांनी दिला. उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, प्रा.डॉ.एस.पी.कापडे, प्रा.डॉ.अनिल पाटील, प्रा.गणेश जाधव, प्रा.संतोष जाधव, प्रा.विनोद अहिरे, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.भारती सोनवणे, प्रा.वैशाली कोष्टी, प्रा.सी.टी.वसावे, प्रा.सुभाष कामडी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा महाजन तर आभार वैष्णवी माळीने मानले.

म्युनिसीपल हायस्कूल
भुसावळ : नगरपरीषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलमण्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके होते. विद्यार्थिनी युक्ती मनोज मिश्रा व संध्या संतोष डवरे यांच्याहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !