भुसावळातील ‘त्या’ विवाहितेचा उपचारापूर्वीच मृत्यू


‘That’ married woman in Bhusawal died before treatment भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर भागातील रहिवासी असलेल्या विवाहितेची प्रसुती झाल्यानंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला रविवारी श्री रीदयम रुग्णालयात हलवण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच या विवाहितेचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उपचारापूर्वीच मृत्यू
आरती सचिन कंडारे (28, वाल्मीक नगर, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आरती कंडारे या प्रसुती झाल्यानंतर पाच दिवसांनी त्यांची अचानक प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना शनिवार, 12 रोजी रात्री 8.35 वाजता शहरातील रीदयम रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तपास हवालदार नेव्हील जॉज बाटले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !