चाळीसगावातील माजी नगरसेवकाच्या मुलावर चॉपरने हल्ला : 12 संशयीतांविरोधात गुन्हा


Chopper attack on former councilor’s son in Chalisgaon : Crime against 12 suspects चाळीसगाव : व्याजाच्या पैशांच्या वादासह पोलिसात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवकाच्या मुलासह दोघांवर तलवारीसह चॉपरने हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील सेंट्रल बँकेसमोर घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरून 12 जणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे परत न केल्याने हल्ला
अंकित महेंद्र मोरे (15, हनुमानवाडी) या तरुणाला व्याजाने दिलेले पैसे का परत केले नाही? तसेच अंबड पोलीस स्टेशनला तक्रार का केली? अशी विचारणा करत संशयीत आरोपींनी चॉपरने हल्ला चढवत त्यास गंभीर जखमी केले. या हाणामारीत हर्षल दीपक राठोड (16, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) हा तरुणही जखमी झाला. जखमी झालेल्या तरुणांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या हल्ल्याप्रकरणी महेंद्र भगवान मोरे यांच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलिसात सुमित उर्फ बाब अशोकराव भोसले (पोद्दार शाळेजवळ, चाळीसगाव), संतोष उर्फ संता पहेलवान रमेश निकुंभ, श्याम उर्फ सॅम चव्हाण, उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे (तिन्ही रा.हिरापूर, ता.चाळीसगाव), सचिन सोमनाथ गायकवाड (बाबाजी चौक, चाळीसगाव), अमोल गायकवाड, कृष्णा गायकवाड (दोन्ही रा.चाळीसगाव), योगेश पांचाळ (हिरापूर), विक्की पालवे व तर तीन ते चार अनोळखी (पूर्ण नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !