Shraddha Walkar Murder Case आधी केली हत्या नंतर मृतदेहाचे केले 35 तुकडे : श्रद्धा हत्याकांडात दररोज धक्कादायक खुलासे


Shraddha Walkar Murder Case नवी दिल्ली : दिल्लीतील हत्याकांड प्रकरणी दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. आफताब अमीन पूनावालाने खून केल्यानंतर श्रद्धाचे शीर कापून फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच, तो दररोज श्रद्धाचा चेहरा पाहत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आफताब त्याच खोलीत झोपायचा, ज्या खोलीत त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते.

मृतदेहाचे 35 तुकडे केले
हत्येचा कट रचण्यासाठी आफताबने दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याने घर घेतले होते का, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याने लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा वॉकरची हत्या आणि मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशीदरम्यान तो नवनवीन खुलासे करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांच्यात वारंवार भांडणे होत होती.





आरोपीने दिली हत्येची कबुली
श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताबनं हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले? हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्या जंगलात गेले. शोध मोहीम तीन तास चालली असून, श्रद्धाच्या मृतदेहाचे 10 तुकडे सापडले आहेत. आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली असं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी श्रद्धा आणि आफताब यांच्या कॉमन फ्रेंडचीही चौकशी सुरू केलीय.

अनेक धक्कादायक खुलासे समोर
पोलिसांच्या माहितीनुसार, आफताब केवळ इंग्रजीत बोलत आहे. Yes i killed Her सांगत आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली. परंतु आतापर्यंतच्या चौकशीत आणि तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. १८ मे रोजी आफताबनं गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर पुढील ३ महिने हळूहळू तो मृतदेहाचे तुकडे फेकत होता. श्रद्धाच्या हत्येनंतर २ महिन्यांनी आफताब पुन्हा डेटिंग एपच्या माध्यमातून सक्रीय झाला होता. त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. जून आणि जुलैमध्ये त्याच्या घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे पडले असताना त्याने नव्या गर्लफ्रेंडला घरी बोलावलं होतं.

हत्येच्या दिवशी काय घडलं?
हत्येच्या दिवशी काय घडलं या प्रश्नाच्या तपासात पोलिसांना थरकाप उडवणारी माहिती हाती लागली. १८ मे रोजी श्रद्धा आणि आफताब यांच्या लग्नावरून भांडण झाले. या भांडणात आफताब श्रद्धाच्या छातीवर बसून तिचा गळा दाबू लागला. हत्या केल्यानंतर सर्वात आधी त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर इंटरनेटवरून मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्च करू लागला. दुसऱ्यादिवशी त्याने इलेक्ट्रिक चाकू खरेदी केला त्याने मृतदेहाचे तुकडे केले. श्रद्धा आणि त्याचे रक्ताचे कपडे कचरा उचलणाऱ्या गाडीत फेकले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कबर्ड, किचन आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर इंटरनेटवर पुरावे मिटवण्याचा शोध घेऊ लागला. बाजारात हायपोक्लोरिक एसिड खरेदी केले आणि घरातील लादी साफ केली जेणेकरून फॉरेन्सिक तपासात पुरावे मिळू नये. आफताबनं शेफचं ट्रेनिंग घेतले. हत्येच्या २ दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता. पुढील ३ महिने त्याला एक एक तुकडे जंगलात फेकला. त्याचसोबत श्रद्धाचे सोशल मीडिया अकाऊंट एक्टिव्ह ठेवले जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. आफताबनं श्रद्धाच्या नावानं मित्रांशी चॅटिंग केले होते. ६ महिने तो पोलिसांना चकमा देत होता. परंतु ज्यादिवशी पोलिसांनी त्याचं दार ठोठावले तेव्हा त्याचे सर्व प्लॅनिंग उघड झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !