वरणगावात स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

बाळासाहेब ठाकरे ’अमर रहे’ च्या घोषणानी निणादला परीसर


वरणगाव  शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरूवारी सकाळी शिवसेना संपर्क कार्यालयात सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यानी प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदुहृदसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे ’अमर रहे’ च्या घोषणांनी परीसर निणादला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, जिल्हा अल्पसंख्यांक संघटक सईद शेख, मोहसीन खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुधाकर जावडे, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष समाधान चौधरी, रवींद्र सोनवणे, प्रकाश नारखेडे, रवींद्र पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, रोहिणी जावडे, प्रतिभा तावडे, श्रद्धा गायकवाड, दिलीप गायकवाड, महिला शहराध्यक्ष रंजना पाटील, युवक राष्ट्रवादीचे वाय.आर.पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र सुरवाडे, शिवसेनेचे उप शहरप्रमुख अशोक शर्मा, सुखदेव धनगर, सुनील भोई, संजू कोळी, शिवा भोई, गुणवंत भोई, मोहन धनगर, उपसरपंच उल्हास भारसके, प्रकाश कोळी, ज्ञानदेव पाटील, राजेश महाजन, प्रल्हाद माळी, किरणं माळी, पंकज माळी, भुषण माळी, पंकज पाटील, निलेश सुरडकर, महेश सोनवणे, बाळू माळी, आबा सोनार, विनोद भोई, उमाकांत झांबरे, निलेश काळे, नरेंद्र इंगळे यांच्यासह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !