भुसावळात स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
भुसावळ : हिंदू ह्रदयसम्राट, सर सेनापती, शिवसेना प्रमुख वंदनीय के.बाळासाहेब ठाकरे यांना दहाव्या स्मृतीदिनानिमित्ताने बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर अभिवादन करण्यात आले. स्व.बाळासाहेब यांच्या प्रतिमेस शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुनव्वर खान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, प्रा.उत्तमराव सुरवाडे, वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महिला जिल्हा संघटक पूनम बर्हाटे यांनी माल्यार्पण केले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख निलेश महाजन, शिवसेना संगटक प्रा.धीरज पाटील, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खंबायत, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना समन्वयक उमाकांत (नमा) शर्मा, अॅड.श्याम श्रीगोंदेकर, काँग्रेस सेवा दलाचे संजय खडसे, राकेश खरारे, रहिम गवळी, शेख मकबूल, गोकुळ बाविस्कर, अरुण साळुंखे, सोनी ठाकुर, योगेश बागुल, पिंटू भोई, नामदेव बर्हाटे, अन्सार शाह, अमजद खान, नबी पटेल, दिनेश इखारे, मेजर गणेश जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब कुठेही नाही गेले असून ते प्रत्येक कट्टर शिवसैनिकांच्या ह्रदयात आहेत आणि कायम राहतील, आमची ओळख ही साहेबांच्या शिवसेने मुळे आहे, असे उद्गार उमाकांत शर्मा (नमा) यांनी काढले.

