छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य : राज्यपालांचे धोतर फाडणार्‍यास मिळणार एक लाखांचे बक्षीस


Offensive statement about Chhatrapati Shivraya: A reward of one lakh will be given to anyone who betrays the governor’s dhoti पुणे : वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणार्‍या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत त्यांचे धोतर फाडणार्‍यास एक लाखांचे पारीतोषीक जाहीर केले आहे.

नेत्यांची तुलना केली छत्रपती शिवरायांशी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केल्याने नवा वादाला तोंड फूटले आहे. राज्यपालांच्या या विधानावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असून विरोधकांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.





धोतर फाडल्यास एक लाखांचे बक्षीस
दरम्यान, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील अनेक भागात फलक लावले आहेत. या फलकांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावर उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध असा मजकूर छापण्यात आला आहे. तर ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे धोतर फाडणार्‍या व फेडणार्‍यास एक लाख रूपये रोख रक्कम देण्यात येईल !’ असे देखील यावर नमूद करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !