स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानजनक वक्तव्य केवळ जनतेचे लक्ष वेधण्यासाठीच : खासदार रक्षा खडसे यांनी राहुल गांधींचा केला निषेध


मुक्ताईनगर : कुशल हिंदू संघटक, थोर स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान खामगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. निषेध सभेला खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित राहून कॉग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला.

जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अपमानजनक वक्तव्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात असून महाराष्ट्रात त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करून समस्त हिंदू जनासह महाराष्ट्राच्या जनमानसाचे मन दुखविण्याचे काम काँग्रेस करीत असल्याचे खासदार खडसे म्हणाल्या.



यांची होती होती उपस्थिती
जाहीर निषेध सभेस खासदार रक्षा खडसे यांच्यासह माजी मंत्री आ.डॉ.रणजीत पाटील, डॉ.राजेंद्र फडके, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे, आमदार प्रकाश पाटील-भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, बुलडाणा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, वाशिम भाजपा जिल्हाध्यक्ष राजू पाटील-राजे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, बलदेवराव चोपडे, माजी महापौर विजय अग्रवाल, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, दीपक बोरकर, माधवराव जाधव, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य शांताराम दाने, विनोद वाघ, सचिन देशमुख आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !