Silent march in Bhusawal demanding execution of Shraddha Walker’s killer श्रद्धा वालकरच्या खुन्याला फाशी देण्याच्या मागणीसाठी भुसावळात मूक मोर्चा


Silent march in Bhusawal demanding execution of Shraddha Walker’s killer भुसावळ : श्रध्दा वालकर खुन प्रकरणातील आरोपीला भर चौकाशी फाशीची शिक्षा द्यावी, धर्मांतरावर न्यायालयाची संमती सक्तीची करावी, बलात्कार व अमानुष हत्या प्रकरणातील आरोपी व कुटूंबीयांना मिळणार्‍या सर्व शासकिय सुविधा बंद करण्याच्या मागणीसाठी शहरातील 21 विविध संस्थांनी सोमवार, 21 रोजी प्रांताधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. काळ्या फिती व काळ्या साड्या घालून महिलांनी या मोर्चात सहभाग नोंदवत प्रशासनाला निवेदन दिले.

फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा खटला
दिल्ली येथील मानवतेला काळीमा फासणार्‍या घटनेत लव्ह जिहाद या जिहादी प्रवृत्तीची बळी पडलेल्या श्रध्दा वालकर खुन प्रकरणाचा सर्व संघटनांकडून निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीचे जलदगती न्यायालयाकडून चौकशीचे आदेश व्हावेत. लव्ह जिदादचे पेव आता खेड्यापाड्यात पोहोचत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रकरणी शहरातील 21 विविध संघटनांनी सोमवारी गांधी पुतळ्यापासून प्रांताधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला.



लिव्ह इनला पायबंद घालावा
मुलींना धर्मांतरीत होण्यासाठी दबाव टाकला जातो आणि नंतर अमानवीय कृत्ये होतात. यामऊळे धर्मांतर करण्यासाठी न्यायालयाची संमती सक्तीची करावी, प्रत्येक राज्यात धर्मांतरण बंदी कायदा सक्तीने राबवला जावा, समाजकंटक व त्यांच्या परीवाराला मिळणार्‍या शासकिय सुविधा बंद कराव्या, अशा कुटूंबातील व्यक्तींना पुढील 50 वर्ष शासकिय सेवेत नोकरी देवू नये, लिव्ह इन रिलेशनसारख्या असंस्कृतीक प्रकार तातडीने रद्द करुन यास न्यायालयाची संमती सक्तीची करावी, जिहादी व देश विघातकी संघटनांवर कायमची बंदी लादावी, महिला विरोधात अत्याचाराचे प्रमाण वाढल्याने कायद्याची कठोरपण अंमलबजावणी करावी,या मागणीसाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

या संघटनांचा सहभाग
या मुकमोर्चात अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, हिंदू जागरण मंचचे अ‍ॅड.योगेश बाविस्कर, सक्षम नारी फाऊंडेशनच्या डॉ.सुवर्णा गाडेकर, राष्ट्र सेविका समितीच्या वृंदा मुळे, कल्याणी ओक, महिला क्रीडा मंडळाच्या आरती चौधरी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनी सावकारे, जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुपच्या राजश्री बादशहा, पिंकेथॉनच्या माधुरी गुजर, महिला पंतजली योग समितीच्या महानंदा पाटील, अग्रवाल महिला मंडळाच्या अ‍ॅड.कल्पना टेमाणी, साईलीला महिला बचत गटाच्या सुनिता राणे, जायंट्स प्रेरणा सहेली ग्रुपच्या वर्षा लोखंडे,सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या राजेश्री नेवे, अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या डॉ.वंदना वाघचौरे, महिला मुक्ती मोर्चाच्या संगिता भांबरे, अनुश्री बहुउद्देशीय संस्थेच्या जयश्री इंगळे, श्रीकृपा महिला बचत गटाच्या नेहा यावलकर, अनिता आंबेकर, शालिनी वाढेकर, रोहित महाले, सुनंदा औंधंकर आदी उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !