श्रद्धा वालकरची हत्या करणार्‍या आफताब पुनावालाला फाशी द्यावी

फैजपूर शहरात प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन


फैजपूर : दिल्ली येथील हिंदू समाजातील तरुणी श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत अमानवी पद्धत्तीने हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देवून करण्यात आली.

निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देताना डॉ.प्रियदर्शनी सरोदे, सावद्याचे माजी नगराध्यक्षा अनिता येवले, अ‍ॅड.कालिदास ठाकूर, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, भाजपाचे अध्यक्ष जितेंद्र भारंबे, बजरंग दल जिल्हा संयोजक प्रतीक भिडे, फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, अनिरुद्ध सरोदे, प्रभुदास महाजन, दीपक पाटील, हर्षल महाजन, राहुल भोई, वैभव तेली, संदीप भारंबे, सुनील जोगी, देवेंद्र जोशी, अनुराधा परदेशी, भारती पाटील, दीपाली झोपे तसेच सकल हिंदू संघटना, रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !