भुसावळात काँग्रेसने राज्यपालांच्या प्रतिमेला मारले जोडे

आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध : राज्यपालाची महाराष्ट्राबाहेर हकालपट्टीची मागणी


In Bhusawal, Congress killed the image of the Governor भुसावळ : भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे बुधवारी प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

कोश्यारी यांची हकालपट्टी करावी
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत आहे. जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण भारतवासीयांच्या हृदयात अढळ स्थान असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधान करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. वारंवार समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करणार्‍या भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



यांची आंदोलनप्रसंगी उपस्थिती
प्रसंगी भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड.कैलास शेळके, प्रदेश सचिव भगवान मेढे, तालुकाध्यक्ष शैलेश बोदडे, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष विलास खरात, अजगर भाई, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, महिला शहराध्यक्ष यास्मीन बी., अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, अतुल पानपाटील, महिला जिल्हा सचिव हमीदा गवळी, फातिमा आपा, भुसावळ तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष कल्पना तायडे, मोरे, युसूफ भाई, सेवा दल शहराध्यक्ष संजय खडसे, विलास विरघट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !