भुसावळातील आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ : शहरातील ब्राम्हण संघाशेजारील श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व भुसावळ शहर पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 23 नोव्हेंबर रोजी शहरातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराला पत्रकारांचा प्रतिसाद
शहरातील श्री रीदयम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित शिबिरात प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी करून मार्गदर्शन करण्यात आले तसेच नेत्रम हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकास फळ झाड देण्यात आले. श्री रीदयम हॉस्पिटलचे डॉ.शंतनू कुमार साहू, डॉ.महेश पांगळे, डॉ.कुशल पाटील. डॉ.जयपालसिंग पवार, डॉ.मनीष रगडे, डॉ.सैय्यद यांनी तर नेत्रम हॉस्पिटलचे सुनील मेश्राम यांनी नेत्र तपासणी केली. शिबिर यशस्वीतेसाठी निलेश वाणी व हॉस्पिटलमधील सहकार्‍यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !