भुसावळातील प्रभाग 24 मध्ये दोन हजार कुटूंबियांना डस्टबीनचे वाटप

सामाजिक कार्यकर्त्या दीपाली बर्‍हाटे यांचा उपक्रम : स्वच्छतेचा दिला संदेश


भुसावळ : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील सामाजिक कार्यकर्त्या दीपाली बर्‍हाटे यांनी प्रभागात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी प्रभागातील दोन हजार कुटूंबियांना डस्टबीनचे वाटप केले. या अनोख्या उपक्रमामुळे प्रभागातील अस्वच्छतेचा प्रश्न बर्‍याच अंशी निकाली निघणार असून नागरीकांनी डस्टबीनमध्ये कचरा टाकून तो नगरपालिकेच्या घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन बर्‍हाटे यांनी केले आहे.

घरातील कचरा रस्त्यावर न टाकण्याचे आवाहन
शहरातील कचर्‍याचा प्रश्न बिकट असून घंटागाड्यांची सुविधा असली तरी घरातील कचरा थेट रस्त्यावर येत असल्याने अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे घराघरातून निघणारा कचरा घंटागाडीत टाकला जावा तसेच ओला व सुका कचरा विलगीकरण होण्यासाठी प्रभाग 24 मधील समाजसेविका दीपाली बर्‍हाटे यांनी पुढाकार घेतला आहे. दीपाली बर्‍हाटे यांनी तब्बल दोन हजार नागरीकांना डस्टबीनचे वितरण केले. तसेच घरातून निघणारा कचरा थेट नालीमध्ये किंवा रस्त्यावर न टाकता, तो डस्टबीनमध्ये साठवून घंटागाडीत टाकावा, असे आवाहन केले.



उपक्रमाचे नागरीकांकडून कौतुक
नालिमध्ये कचरा टाकल्यास नालित कचरा तुंबून डासांचा उपद्रव वाढतो. यामुळे कीटकजन्य आजारांचे रुग्ण वाढतात. यामुळे कचरा व्यवस्थापन सर्वांत महत्वाचे असल्याने डस्टबीनचे वितरण केल्याचे दीपाली बर्‍हाटे यांनी सांगितले. या उपक्रमाचे प्रभाग 24 च्या नागरीकांनी कौतूक केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !