भुसावळाचे नाव उंचावणार्‍या मान्यवरांचा पुरस्काराने सन्मान


भुसावळ : समाजात निस्वार्थी हेतूने व प्रसिद्धीच्या मागे न लागता समाजसेवा करणार्‍या शहरातील मान्यवरांचा रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे भुसावळ प्राईड पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. प्रभाकर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष डॉ.मकरंद चांदवडकर, सचिव सन्मित पोतदार, सहायक प्रांतपाल अरुण नंदर्शी यांची उपस्थिती होती.

रोटरी रेलसिटीचा उपक्रम कौतुकास्पद
प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन सोनू मांडे यांनी केले. प्रांतपाल डॉ.आनंद झुनझुनवाला यांनी हा पुरस्कार प्रदान करणे हे आपले सौभाग्य असून समाजातील असे हिरे शोधून काढून त्यांना सन्मानीत करण्याच्या रोटरी रेलसिटीचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी रेलसिटी सदस्य मिलिंद धर्माधिकारी व श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास रोटरी सदस्य, पुरस्कार विजेते तसेच भुसावळकर नागरिक उपस्थित होते.



या मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
भुसावळातील डॉ.तुषार पाटील, सुरेंद्र चौधरी, प्रवीण नायसे, रवींद्र सोनवणे, गिरीश माळी आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !