जिल्हा दुध संघ निवडणुकीत खडसेंविरुद्ध लढणारच : आमदार मंगेश चव्हाण
District Milk Union will fight against Khadse in elections: MLA Mangesh Chavan जळगाव जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंविरुद्ध निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला आहे. जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर होण्याआधी पासून आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत आवाज उठविला होता. तेव्हापासून माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि आमदार चव्हाण यांच्यात जोरात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सुरुवातीला सर्वपक्षीय पॅनलची भूमिका दोन्ही गटांकडून समोर आली होती परंतु आमदार चव्हाण यांनी खडसे वगळता सर्वपक्षीय पॅनलची भूमिका पहिल्या दिवसापासून कायम ठेवली.
सर्वपक्षीय पॅनलसाठी फिल्डींग
भाजप शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांनी बैठका मिळावे सुरू केल्यामुळे सर्वपक्षीय पॅनलची शक्यता धूसर झाली होती. परंतु आज सकाळपासून दोन दिग्गज नेते सर्वपक्षीय पॅनलसाठी जोरदार फील्डिंग लावत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.


खडसेंविरोधात लढणारच
याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला बातम्यांच्या माध्यमातूनच सर्वपक्षीय पॅनल संदर्भात पुन्हा एकदा प्रयत्न सुरू असल्याचे कळाले मात्र आपण खडसेंविरुद्ध निवडणूक लढवणार आहे. ु मी निवडणूक लढवून दूध संघासाठी जनतेतून कौल मागण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे.