निमखेडीतील जवानाची अग्निवीर म्हणून निवड


Selection of Nimkhedi jawan as Agniveer मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी बुद्रुक गावातील रहिवासी असलेल्या पुरुषोत्तम महादेव तायडे या तरुणाची भारतीय लष्कराच्या अग्नीवीर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातून निवड झालेल्या पुरूषोत्तम या तरुणावर निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अथक परीश्रमाला आले यश
पुरुषोत्तम हा ज्ञानपूणाृ विद्यालय इच्छापूर-निमखेडी येथील शाळेचा विद्यार्थी असून गेल्या तीन वर्षांपासून अग्नीवीर म्हणून नियुक्ती होण्यासाठी मेहनत घेत होता व त्याच्या मेहनतीला यश आले आहे. शारीरीक कसरत करत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विविध विषयांचा अभ्यासदेखील करत होता. औरंगाबाद येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रिया दरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी होऊन नुकतीच 13 ऑक्टोंबर रोजी परीक्षा झाली. त्यात तो उत्तीर्ण होऊन नियुक्ती झाल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील पहिला अग्नीवीर होण्याचा बहुमान मिळवला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !