शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता शिर्डी देवस्थानचे सीईओ


Disciplinary officer Tukaram Mundhe is now the CEO of Shirdi Devasthan शिर्डी :  शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची महिनाभरातच आरोग्य खात्यातून बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे आता शिर्डीतील साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नवीन जवाबदारी असणार आहे.

महिनाभरातच केली बदली
गत महिनाभरातच आरोग्य विभागात आयुक्तपदी तुकाराम मुंढे रूजू झाले व त्यांनी आरोग्य विभाग चांगलाच वठणीवर आणला मात्र राज्य सरकारने मंगळवारी अचानक तुकाराम मुंढे यांची बदली केल्याने आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुटकेचा श्वासन घेतला आहे. मंगळवारी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून साई संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, तर साई संस्थानच्या सीईओपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !