संविधान दिन हा राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा
अनोमदर्शी तायडे : सावदा शहरात रीस्पेक्ट युथ फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
सावदा : भारतीय संविधान दिनानिमित्त रीस्पेक्ट युथ फाउंडेशनतर्फे समतापथिक प्रज्ञा परीक्षा 2022 चा निकाल घोषित करण्यात आला. आ. गं. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीसरातील विविध मान्यवरांच्या हस्ते यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनोमदर्शी तायडे म्हणाले की, आपल्याला स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचे जीवन जगण्याचा अधिकार देणार्या भारतीय संविधान विषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात जनजागृती व्हावी, उद्याची येणारी पिढी, उद्याच्या नागरिक केवळ पोट भरू माणूस न घडता एक सक्षम नागरीक घडणे गरजेचे आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव व निंभोरासीम गावचे उपसरपंच राजू सवर्णे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वढोदा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर सोनवणे, सामाजिक समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे, जेडीसीचे शाखा व्यवस्थापक स्वप्नील तायडे, रायपूर तलाठी श्रीहरी कांबळे, रीतेश परदेशी, अॅड.राजकुमार लोखंडे, कल्पेश खत्री, सचिन झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते.


यांनी मिळवले यश
परीक्षार्थीमधून लहान गटातून- प्रथम अक्षदा नितीन कुमावत, द्वितीय- कामिनी प्रभाकर लोखंडे, दिशा सतीश बोदडे (यांना विभागून), तृतीय संचेती आनंद तायडेचा आला. मोठ्या गटातून प्रथम- अमोल विनोद इंगळे, द्वितीय- सुशील वसंत लहासे, तृतीय- कुणाल सुनील तायडे यांचा आला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, प्रमाणपत्र व संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देण्यात आली.उमेश गाढे व राजकुमार लोखंडे, नंदकिशोर सोनवणे, रीतेश परदेशी यांनी मत मांडले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून व 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन पंकज बोदडे आणि सिद्धार्थ तायडे यांनी केले. आभार आनंद वाघोदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रीस्पेक्ट युथ फाऊंडेशनचे अॅड.सचिन तायडे, कुंदन तायडे, विक्रम तायडे, दीपक बोदडे, प्रदीप तायडे, शिरीष वाघोदे, अक्षय वाघोदे, चेतन लोखंडे,राहुल वाघ, विकास लोखंडे, योगेश पूर्भी, करण साळुंखे, सचिन लोखंडे, संजय लोखंडे आदी सदस्यांनी परीश्रम घेतले.