आमदारांचा दुध संघ निवडणुकीत विजय : भुसावळात भाजपा पदाधिकार्‍यांचा जल्लोष

वाढदिवसाच्या दिवशी मिळाले गिप्टः कार्यकर्त्यांसोबत आमदार सावकारेंंनी धरला ठेका


भुसावळ : भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांना जळगाव जिल्हा दुध संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर भुसावळात त्यांचे आगमन होताच भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी नाहाटा चौफुलीवरच रविवारी दुपारी त्यांचे जोरदार स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरावर आमदार सावकारे यांनी सुध्दा कार्यकर्त्यासोबत ठेका धरला.

आमदारांना दुहेरी गिप्ट
दुध संघातील विजय आणि रविवारी असलेला त्यांचा वाढदिवस यामुळे उत्साह अधिक जाणवत होता. आमदार संजय सावकारे यांचा रविवारी वाढदिवस असतानाच याच दिवशी ते जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले. आमदार संजय सावकारे हे जळगाव येथून नहाटा चौफुलीवर आल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-ताश्यांच्या गजरात कार्यकर्ते नाचत असतांनाच आमदार सावकारे यांनी सुध्दा कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.



यांची होती उपस्थिती
यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व पक्षाचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, प्रमोद सावकारे, अनिरूध्द कुळकर्णी, प्रतापसिंग पाटील, सुनील महाजन, गोलू पाटील, किरण कोलते, संतोष बारसे, मुकेश पाटील, अजय नागराणी, किशोर पाटील, संदीप सुरवाडे, विजय चौधरी, राजेंद्र चौधरी, राजेंद्र नाटकर, सी.ए.प्रा.दिनेश राठी, प्रशांत निकम, राजू महाजन, बंटी सोनवणे, विलास सपकाळे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, सुमित बर्‍हाटे, प्रशांत नरवाडे, दीपक भिरूड, भैय्या महाजन, राजू आवटे, चेतन सावकारे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सावकारे यांना फुले, बुके, पुष्पहार घालण्यासाठी समर्थकांनी एकच गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !