भुसावळातील प्रभाग 24 मध्ये मतदान नाव नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजसेविका दीपाली वाणी-बर्‍हाटे यांचा उपक्रम : नाव नोंदणीचे आवाहन


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील सामाजिक कार्यकर्ता दीपाली वाणी-बर्‍हाटे यांच्या सहकार्यातून महेश नगरातील विठ्ठल मंदिरात बुधवार, 14 डिसेंबरपासून तीन दिवसीय मतदान नाव नोंदणी शिबिराला सुरूवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी शंभरावर नागरीकांनी आपली नाव नोंदणी केली. या शिबिराला नागरीकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.

शिबिरात होणार विविधकामे
सकाळी 10 ते 5 वाजेदरम्यान आयोजित मोफत शिबिरात मतदान नाव नोंदणी तसेच आधारकार्ड व मतदान कार्ड लिंक करणे यासह ई-श्रम कार्ड व डिजीटल आरोग्य कार्ड तयार करण्यात येत आहे. ज्या मतदारांना नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी वयाचा पुरावा यात जन्म दाखला, आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशकार्ड, पासपोर्ट, बँक पास बुक, लाईटबिल सादर करावे. तसेच आधारकार्ड मतदान कार्डाशी लिंक करण्यासाठी आधाकार्ड व मतदान कार्डाची झेरॉक्स व मोबाईल नंबर अशी कागदपत्रे आणावेत तसेच आरोग्य कार्डसाठी आधार कार्ड व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल तर ई-श्रमकार्डसाठी आधार कार्ड, बँक पासबुक व लिंक असलेला मोबाईल आणवा व प्रभाग क्रमांक 24 मधील नागरीकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्त्या दीदपाली गणू वाणी-बर्‍हाटे व विजय योगराज बर्‍हाटे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !