मुक्ताईनगर तालुक्यातील सहा गावांना मिळणार महसुली दर्जा
चार नवीन तर मुक्ताईनगर व अंतुर्ली येथे नवीन दुसरे साझे
मुक्ताईनगर (संदीप जोगी) : मुक्ताईनगर तालुक्यातील सहा गावांना महसुली दर्जा मिळणार असून प्रशासनाकडून तशी तयारी सुरू आहे. यामध्ये तालुक्यातील कोथळी, पिंप्रीनांदू, बोरखेडा, रुईखेडा हे चार नवीन साझे व मुक्ताईनगर येथे दुसरे नवीन साझे व अंतुर्ली येथे दुसरे नवीन साझे असे सहा महसुली गावे निर्माण होणार असल्याची माहिती तहसीलदार श्वेता संचेती यांनी दिली.
86 गावांना मिळणार महसुली दर्जा
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नव्याने महसुली गावांची पुनर्रचना होणार आहे.जिल्ह्यातील 146 तलाठी साझे व 24 महसूल मंडळांमध्ये तलाठी व मंडळ अधिकार्यांची पदे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच तलाठी साझा पुनर्रचनेनुसार आता गावाचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यातून तयार झालेल्या जिल्ह्यातील 86 गावांना महसुली गावांचा दर्जा देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गावांच्या विभाजनासाठी तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील नव्याने 86 गावांचे गट क्रमांकानुसार गाव नकाशे व आकारबंद तयार झाल्यानंतर त्या गावांना नव्याने तयार झालेल्या 86 गावांचे गट क्रमांकानुसार गाव नकाशे व आकारबंद तयार झाल्यानंतर त्या गावांना महसुली गावांचा दर्जा देण्यात येणार आहे. त्यानुसार कामकाज करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी महसूल अधिकार्यांना दिल्या आहेत. नवीन तयार झालेल्या 86 गावांना रैन्डमली गट क्रमांक द्यावे लागणार आहेत. त्यासाठी नवीन गट क्रमांक तयार करावे लागणार आहे. त्याचे फेरफार करावे लागेल.

मुक्ताईनगर तालुक्यातील नवनिर्मित साझा
कोथळी, पिंप्रीनांदू, बोरखेडा, रुईखेडा येथे नवीन साझे तर मुक्ताईनगर येथे दुसरे नवीन साझे व अंतुर्ली येथे दुसरे नवीन साझे असे एकूण सहा गावांना महसुली दर्जा मिळणार आहे. आता मुक्ताईनगर येथे दोन व अंतुर्ली येथे दोन साझे होणार आहेत.