भुसावळात उद्या मतदार नाव नोंदणी शिबिर

सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाणी (बर्‍हाटे) यांच्यातर्फे शिबिराचे आयोजन


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 च्या समाजसेविका दीपाली गलू वाणी (बर्‍हाटे) यांनी प्रभागातील नागरीकांच्या सोयीसाठी मतदान नाव नोंदणी, आधार कार्ड मतदान कार्डाशी लिंक व डिजिटल आरोग्य कार्डसाठी मोफत शिबिराचे आयोजन बुधवार, 21 रोजी केले आहे. जामनेर रोडवरील डिगंबर नगर, महालक्ष्मी हार्डवेअरपुढे हे शिबिर होणार आहे.

शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
या शिबिरात मतदान नाव नोंदणी तसेच आधारकार्ड व मतदान कार्ड लिंक करण्यासह डिजीटल आरोग्य कार्ड तयार करण्यात येणार आहे. ज्या मतदारांना नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी वयाचा पुरावा यात जन्म दाखला, आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशकार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, लाईटबिल सादर करावे तसेच आधारकार्ड मतदान कार्डाशी लिंक करण्यासाठी आधारकार्ड व मतदान कार्डाची झेरॉक्स व मोबाईल नंबर अशी कागदपत्रे सोबत आणावीत तसेच आरोग्य कार्डसाठी आधार कार्ड व त्याच्याशी लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील नागरीकांनी या मोफत कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गलू बर्‍हाटे (वाणी) यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !