कोथळीतील अॅम्युजमेंट पार्कसाठी चार कोटींचा निधी मंजूर
A fund of four crores has been approved for the amusement park in Kothali मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताबाई अंतर्धान स्थळ कोथळी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या तीर्थक्षेत्रास एकनाथराव खडसे यांनी मंत्री पदांच्या कार्यकाळात ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे. खडसे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाने 14 डिसेंबर 2022 रोजी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत कोथळी येथील अॅम्युजमेंट पार्कला चार कोटी 47 लाख 96 हजारांचा निधी मंजूर केला आहे.
2018 मध्ये अॅम्युजमेंट पार्कला मंजुरी
सन 2018 साली कोथळी येथे अॅम्युजमेंट पार्कला मंजुरी मिळाली तर
एकूण अंदाजित 10 कोटी रुपये किंमतीचा हा प्रकल्प असून तत्कालीन पर्यटन मंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते व 2018 पासून या पार्कच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यावेळी मंजूर एक कोटीतून अनेक कामे करण्यात आली मात्र निधीअभावी अनेक कामे रेंगाळली मात्र या कामाला निधी मिळावा यासाठी एकनाथराव खडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता.

आता प्राप्त निधीतून मल्टी लेन राईड, ट्यूबन्डफ्लोट राईड, थंडर क्रुझ स्लाईड, ओपन बॉडी स्लाईड, टायफुल टनेल, क्रुसेडर राईड करीता टायफुल टनेल, रेनबो टनेल असे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध होणार असून यातून कोथळी मुक्ताईनगर येथे पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे.