जळगावात तरुणाला मारहाण करीत गोळीबार : आरोपी जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात


Jalgaon beating youth and shooting : Accused in Zillapeth police net जळगाव : तरुणाला मारहाण करीत गोळीबार करण्यात आल्याची घटना शहरातील जी.एस. मैदानावर रविवारी रात्री 11.30 वाजता घडली होती. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी बुधवारी पहाटे भुसावळातून दोघांच्या मुसक्या बांधल्या आहेत. पंकज उर्फ ढेक्या सुरेश पाटील (शिव कॉलनी, जळगाव) आणि किरण शंकर खर्चे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोळीबार करीत काढला होता पळ
जळगावच्या टॉवर चौक ते चौबे शाळेदरम्यान असलेल्या अतिक्रमण काढण्याबाबत भगवान काशीनाथ सोनार (39, शिवाजी नगर, जळगाव) यांनी जळगाव महापालिकेत तक्रार दिल्याचा राग आल्याने रविवार, 11 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जी.एस.मैदानाच्या मुख्य गेटजवळ भगवान सोनार याला पंकज उर्फ ढेक्या सुरेश पाटील (शिव कॉलनी, जळगाव) याने महापालिकेत दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून मारहाण केली तर पंकज पाटील सोबत असलेला किरण शंकर खर्चे (सुप्रीम कॉलनी, जळगाव( याने त्याच्या हातातील बंदुकीने फायर केला होता. फायर केल्याचे पाहताच भगवान सोनार याने आरडाओरड करत एसबीआय बँकेच्या चौकाकडे पळ काढला होता. त्यानंतर पंकज पाटील आणि किरण खर्चे यांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेत दोन्ही पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



भुसावळातून आवळल्या मुसक्या
जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील पथकाने बुधवार, 21 डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयीत पंकज उर्फ ढेक्या सुरेश पाटील (शिव कॉलनी, जळगाव) आणि किरण शंकर खर्चे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्या भुसावळातून मुसक्या बांधल्या. ही कारवाई जळगाव जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोलीस शिपाई अमित मराठे यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !