रावेर बसस्थानकातून अल्पवयीन मुलीला पळवले
A Minor girl was abducted from Rawer Bus Stand रावेर : तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बसस्थानकातून पळवल्याचा संशय
रावेर तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणानिमित्त दररोज रावेरात अप-डाऊन करते मात्र 21 रोजी सकाळी 10.30 ते 3 दरम्यान अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले. पीडीतेच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.

