मुक्ताईनगर-शाहपूर बायपास चौपदरीकरणासाठी 784.35 कोटी मंजूर
खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश
784.35 crores sanctioned for quadrupling of Muktainagar-Shahpur bypass मुक्ताईनगर : औरंगाबाद-इंदौर महामार्गावरील पहूर ते खंडवा एनएच-753एल या खंडातील मुक्ताईनगर ते शाहपूर बायपास या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भारतमाला पक्षहयोजना अंतर्गत रु.784.35 कोटीमचा मंजूर निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेला पाठपुरावा मोलाचा ठरला आहे.
आवश्यक ठिकाणी होणार बायपास
परीयोजना मार्ग भौगोलिक रूपाने मध्यप्रदेश-बर्हाणपूर जिल्हा व महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात स्थित आहे. दोन राज्यांना जोडणार्या मुख्य औरंगाबाद-इंदौर महार्गावर स्थित आहे. एनएच -753एल हा विद्यमान दोन पदरी वाहनमार्ग रस्त्याचा हिस्सा असून जो जामनेर तालुक्यातील पहूर पासून ते मध्यप्रदेशातील खंडवा शहरापर्यंत आहे. जो जळगाव जिल्ह्यातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगरसोबत मध्यप्रदेश राज्यातील बर्हाणपूर शहराला जोडतो व खंडवा शहराजवळ एनएच-347 बी.या जंक्शनवर समाप्त होतो.


सदर परीयोजना महामार्गात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बर्हानपूर जिल्ह्यातील दापोरा व इच्छापूर येथील आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूद करण्यात आलेली आहे. या रस्त्याचे मुक्ताईनगरपर्यंत चौपदरीकरण झाल्यानंतर इंदौर वरून छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जाणार्या वाहतुकीस या मार्गावर वळविण्यात येणार आहे.