यावल शहरात 70 वर्षीय वृद्धेला दोघांची मारहाण


A 70-year-old woman was beaten up by two people in Yawal City यावल : शहरातील देशमुख वाड्यातील एका 70 वर्षीय वृद्ध महिलेला एका मुलाने व एका मुलीने मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी वृद्धेने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.

दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा
यावल शहरातील देशमुख वाड्यात ध्रुपदाबाई पंडित मोरे ही 70 वर्षीय वृद्ध महिला राहते. शौचालयाच्या दरवाज्याला कडी लावली असा संशय घेत प्रेम नामक तरुण आणि राणी नामक तरुणीने तिच्याशी वाद घतला व तु शौचालयाचा दरवाजा का बंद केला असे सांगत दोघांनी या वृद्ध महिलेला शिवीगाळ करून चपटा-बुक्क्यांनी मारहाण करीत धमकी दिली. वृद्धेने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !