भुसावळात जिल्हा सत्र न्यायाधीशांची भेट : वकील संघातर्फे सत्कार
Visit of District Sessions Judge in Bhusawal : felicitated by lawyers association भुसावळ : अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यू एस.एम.शेख यांनी नुकतीच भेट दिल्याने भुसावळ वकील संघातर्फे त्यांचा भुसावळ वकील संघातर्फे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील यांनी सत्कार केला. भुसावळातील वकिलांच्या विविध समस्या व वकिलांना सोयी-सुविधा पुरवण्यासंदर्भात माहिती शेख यांना देण्यात आली.
या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने कोर्ट कॅन्टींग सुरू करण्यासह अॅड.कंझुमर सोसायटीसाठी जागा मिळावी, नवीन इमारतीमध्ये वकील संघाला मोठी बाररूम मिळावी, बोदवड न्यायालय इ कोर्ट अॅप्सवर सुरू करावी तसेच चारचाकी वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करावी, न्यायालय परीसरात सीसीटीव्हीची व्यवस्था करावी, भुसावळ न्यायालयाच्या गेटवर कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच भुसावळ न्यायालय आवारात पोलिस चौकीची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे मोटर अपघात दावा प्राधिकरणाचे दावे लोक अदालतीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. वकिलांच्या सर्व मागण्या सकारात्मकरीत्या पूर्ण करण्याची ग्वाही न्या.शेख यांनी दिली. सूत्रसंचालन अॅड.रम्मू टी.पटेल यांनी केले. यावेळी भुसावळ वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.धनराज पी.मगर, सहसचिव अॅड.पुरुषोत्तम पाटील, सदस्य अॅड.विजय तायडे, अॅड.विश्वंभर वाणी, भुसावळ वकील संघातील सर्व सदस्य उपस्थित होते.
