भोळे महाविद्यालयाच्या खेळाडूची जळगाव विभाग पॉवर लिफ्टींग संघात निवड
Selection of Bhole College Athlete in Jalgaon Division Power Lifting Team भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टींग स्पर्धा रावेरातील नाईक महाविद्यालयात झाल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या पॉवर लिफ्टींग खेळाडू प्रदीप संजय मिरगे याने 83 किलो वजन गटात उपविजेतेपद तर गौरव सोनवणे याने 83 किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला.
यशाबद्दल खेळाडूचा गौरव
प्रदीप मिरगे याची आंतर विभागीय पॉवर लिफ्टींग स्पर्धा रावेरसाठी जळगाव विभाग संघात निवड झाल्याने त्याचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते पुषपगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी शारीरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.

