‘तो’ पुन्हा येतोय…. म्हणून या राज्याने घेत जारी केली नियमावली


बंगळुरू : देशातून कोरोना हद्दपार झाल्याने देशवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण होते मात्र कोरोनाचा नवीन व्हेरीएंट जगात धुमाकूळ घालत असतानात देशातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतासाठी नियोजन सुरू असतानाच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने नवी नियमावली लागू केली. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने राजधानी बंगळुरूमध्ये कोरोनाच्या परीस्थितीबाबत विशेष बैठक घेतली होती. या बैठकीनंतर सरकारने परदेशातून येणार्‍या प्रवाशांसाठी बंगळुरू आणि मंगळुरू येथे दोन रुग्णालये तयार ठेवण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांमध्ये बंगळुरूमधील बौरिंग रुग्णालय आणि मंगळुरूमधील वेनलोक रुग्णालयाच्या नावांचा समावेश आहे. त्याशिवाय सरकारकडून लोकांसाठी अनेक नियम लागू करण्यात आले आहेत.

चित्रपटगृहात आता मास्क सक्ती
आरोग्य विभागाकडून लागू करण्यात आलेल्या सूचनांमध्ये बंद थिएटरमध्ये चित्रपट पाहायचा असेल तर प्रेक्षकांना मास्क लावणे अनिवार्य आहे. त्याशिवाय शाळा आणि कॉलेजमध्येही मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय शाळा आणि कॉलेजमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था आणि सर्वांचे पूर्णपणे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. जर शाळा आणि कॉलेजमध्ये कुणाचे लसीकरण झालेले नसेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल. एवढेच नाही तर नव्या वर्षामध्ये रेस्टॉरंटमध्ये मास्क वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय बारमध्ये बार टेंडरने मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे तसेच त्याचे लसीकरण झालेले असणेही आवश्यक आहे.





नववर्षाचा जल्लोष रात्री एक वाजेपर्यंत
सरकारकडून लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बंगळुरूमधील एमजी रोडवर होणार्‍या उत्सवादरम्यानसुद्धा मास्क वापरण्याची सक्त सूचना देण्यात आली आहे. त्याशिवाय शहरामध्ये नव्यावर्षाच्या जल्लोषासाठी रात्री १ वाजेपर्यंतचीच मुदत देण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !