समरसता महाकुंभात कोरोनाचे नियम पाळावे : जनार्दन हरिजी महाराज


Follow corona rules in Samarastha Mahakumbh: Janardan Hariji Maharaj फैजपूर : निष्कलंक धाम, वढोदा येथे होणार्‍या समरसता महाकुंभ कार्यक्रमास देश-विदेशातील थोर संत-महंतांसह हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत होणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खरबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार 500 स्वयंसेवक, खाजगी सिक्युरीटी गार्ड, नियमित पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. कोणताही अघटीत व अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूर्णपणे खबरदारी घेण्याचे नियोजन सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे शिवाय कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प.पू.जनार्दन महाराजांनी केले आहे.

कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन
रुग्णसेवेसाठी डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, ठिकठिकाणी स्वच्छतागृह, दिवसभरात सकाळी चहा, नाश्ता, दुपार व रात्रीचे भोजन व्यवस्था, भाविकांना येण्या-जाण्यासाठी ठिक-ठिकाणाहून रीक्षा तसेच महाराष्ट्र शासनाच्या बसेसही उपलब्ध असल्याने येणार्‍या भाविकांनी कार्यक्रमाचा यथेच्छ लाभ घ्यावा. या ठिकाणी येताना आपल्या सोबत सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, पॉकेट, पैसे, मोबाईल आदी वस्तू आणू नये व प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करावे मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व श्री राधे राधे बाबा यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !