मुंबईत बॉम्ब ब्लास्टची धमकी देणार्‍यास अखेर अटक


Bomb blast threat in Mumbai finally Arrested मुंबई : मुंबई बॉम्ब ब्लॉस्ट करण्याची धमकी देणार्‍या व्यक्तीस दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीने 7 जानेवारी रोजी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन ब्लास्ट करण्याची धमकी दिली होती.

नियंत्रण कक्षात केला होता दूरध्वनी
7 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन धमकी दिली. 1993 ला जसा बॉम्ब ब्लास्ट झाला तसा बॉम्ब ब्लास्ट दोन महिन्यानंतर मुंबई मध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार आहे. तसेच मुंबई मध्ये 1993 सालासारख्या दंगली होणार आहेत, असा संदेश देण्यात आला.
तसेच यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्बब्लास्ट व दंगली करण्यासाठी बोलवले आहे’ असंही यात म्हटले होते, असा संदेश मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून दहशतवाद विरोधी पथकाच्या नियंत्रण कक्षास प्राप्त झाला होता.





मालाड भागातून संशयीत ताब्यात
या कॉलच्या अनुषंगाने दहशतवाद विरोधी पथकाची 02 पथके तयार करून चौकशी सुरू करण्यात आली. नियंत्रण कक्षास आलेल्या कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून नियंत्रण कक्षास कॉल करणारा व्यक्ती नबी याहया खान उर्फ के.जी.एन.लाला (55, रा.पठाणवाडी, मालाड पूर्व, मुंबई) यास मालाड रेल्वे स्टेशन परीसरातून अटक करण्यात आली. आरोपीविरोधात मुंबई मध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे 12 गुन्हे दाखल आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !