साकरी येथे साने गुरूजींच्या स्मृतींना उजाळा

भुसावळ- तालुक्यातील साकरी येथे साने गुरूजी जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिभा जावळे यांनी साने गुरूजी यांचा जिवना चरीत्राला उजाळा दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य निर्मला तायडे, हेमलता भारंबे, रूपाली खाचणे, किन्ही येथील सत्यभामा गोस्वामी, दीपिका महाजन, वर्षा महाजन, नयना, पशूसखी रूपाली बाविस्कर, अलका करांडे, रूपाली बोडे, नंदा वारके, चारू फालक, पूनम नेहेते, पल्लवी पोते, अनिता पाटील, कविता बोडे, संगीता कापसे, सुनीता करांडे यांच्यासह बचत गटातील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन हेमलता भारंबे तर आभार रूपाली खाचणे यांनी मानले.


