जानेवारीतील कमी तापमानाने केळीचे नुकसान : शेतकर्यांना मिळणार फळपीक विम्याचा लाभ
Compensation of 26 thousand 500 rupees will be received per hectare: Information of MPs मुक्ताईनगर : पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना 2022-23 (आंबिया बहार) अंतर्गत 13 जानेवारी 2023 पर्यंतच्या महावेध माहिती (डेटा) नुसार जळगाव जिल्ह्यातील 49 महसूल मंडळात सलग तीन दिवस किमान तापमान 8 डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिल्याने जिल्ह्यातील केळीला तापमानाचा फटका बसल्याने केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना 26 हजार 500 प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
केळी उत्पादकांना मोठा दिलासा
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2022-23 (आंबिया बहार) अंतर्गत 13 जानेवारी 2023 पर्यंत कमी तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र खालील गावांचा समावेश आहे. भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव, बोदवड तालुक्यातील बोदवड, करंजी, नाडगांव, चोपडा तालुक्यातील अडावद, चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड, जामनेर तालुक्यातील जामनेर, मालदाभाडी, नेरी, मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, घोडसगांव, कुर्हा, रावेर तालुक्यातील खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा तर यावल तालुक्यातील यावल : बामणोद, भालोद, फैजपूर, किनगांव, साखळी, यावलचा समावेश आहे.

जिल्ह्यातील या गावांना लाभ
जळगाव लोकसभा क्षेत्रातील अमळनेर तालुक्यातील अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड, भडगाव तालुक्यातील आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगाव, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ, धरणगाव तालुक्यातील चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद, एरंडोल तालुक्यातील उत्राण, जळगाव तालुक्यातील भोकर, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा गावाचा समावेश आहे.