पाचोर्यातील खून प्रकरणी : पसार आरोपींना वावडदा येथून अटक
Pachora murder case: Pasar accused arrested from Vavadda जळगाव : खून प्रकरणात पसार असलेल्या दोघा पसार आरोपींच्या वावडदा गावातून जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या आहेत. रोशन ओंकार सांळुके (रा.शाहू कॉलनी, पाचोरा) व तेजस प्रदीप पाटील (रा.जयराम कॉलनी, पाचोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पाचोरा पोलिसात आरोपी गुरनं.42/22 या खुनाच्या गुन्ह्यात हवे होते मात्र दरवेळी ते पसार होण्यात यशस्वी होत होते.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रोशन सांळुके व तेजस पाटील हे वावडदा येथे आल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला कळाल्यानंतर आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रीतम पाटील, सचिन महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


