शिरपूरातून कंटेनरमधील 77 लाखांची औषधी लांबवली

दिड महिन्यानंतर दाखल झाला शिरपूर पोलिसात गुन्हा


Medicines worth 77 lakhs in containers were recovered from Shirpur शिरपूर : औषधे वाहून नेणार्‍या कंटेनरमधून सुमारे 77 लाखांची औषधी लांबवण्यात आल्याचा प्रकात गत महिन्यातील 4 जानेवारी रोजी घडला होता. या प्रकरणी तब्बल दिड महिन्यानंतर शिरपूर शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उभ्या कंटेनरमधून औषधी लांबवली
औषधांची वाहतूक करणारा कंटेनर घेवून चालक आसुकुमार रामजित कनोजिया (34, रा.अमावा कला, पोस्ट पट्टी नरेंद्रपुर तहसील, शहागंज जनपत, जीनपुर, उ.प्र) हा जानेवारी महिन्यात निघाला होता मात्र शिरपूरजवळील हॉटेल तिरंगा येथे चालक रात्रीच्या वेळी थांबल्यानंतर दुसर्‍या दिवशी कंटेनरमधील 76 लाख 55 हजार 224 रुपयांची औषधी चोरीला गेल्याची बाब 4 जानेवारी रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. आरोपींनी कंटेनरचे रबरी सील व कुलूप तोडून त्यातील विविध औषधीचे तब्बल 52 बॉक्स लंपास केले आहेत. दरम्यान, तब्बल दिड महिन्यानंतर या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक किरण बार्र्‍हे करीत आहेत. दरम्यान, कंटेनर चालकाने प्रवास केलेल्या ठिकाणापासून तर जेथे-जेथे थांबे घेतले त्या ठिकाणासह रस्त्यात बसवण्यात आलेल्या प्रवाशांबाबत पोलिसांकडून आता माहिती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पाळत ठेवून ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !