धुळे शहरातील सहा पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या


Transfer of six police officers in Dhule City धुळे : शहरातील पोलिस निरीक्षकांसह सहा अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी काढले आहेत. विहित कालावधी पूर्ण झाल्याने तसेच विनंतीवरून या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांची चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक संदीप पाटील यांची आझादनगर पोलिस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. धुळे तालुक्याचे उपनिरीक्षक सागर काळे यांची निजामपूर पोलिस ठाण्यात, थाळनेर पोलिस ठाण्याचे कृष्णा पाटील यांची शिरपूर पोलिस ठाण्यात, निजामपूरचे उपनिरीक्षक सुनील वसावे यांची शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील उपनिरीक्षक सुनील इनमुलवार यांची धुळे शहर वाहतूक शाखेत रीक्तपद बदली करण्यात आली आहे. दरम्यान, धुळे शहर वाहतूक शाखेत सहाय्यक निरीक्षक संगीता राऊत यांच्याकडे तात्पुरता प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !