An employee committed suicide in G.S. Bank in Dhule कर्ज विवंचनेत धुळ्यातील ग.स.बँकेतच कर्मचार्‍याची आत्महत्या


An employee committed suicide in G.S. Bank in Dhule धुळे : दहा लाख रुपयांच्या कर्ज विवंचनेत धुळ्यातील ग.स.बँकेत शिपाई असलेल्या योगेश सुकलाल निकम (45, एकता नगर, बिलाडी रोड, धुळे) यांनी यांनी बँकेतच गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दुपारच्या सुमारास केली आत्महत्या
धुळे शहरातील झाशी राणी चौक परीसरातील शासकीय कर्मचार्‍याच्या ग.स.बँकेत योगेश सुकलाल निकम (45) हे शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांनी बुधवारी बँकेतच ड्युटीवर असताना सायंकाळी वाजेच्या सुमारास गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ग.स बँकेचे व्यवस्थापक संजय देसले हे सायंकाळी बँकेत गेले असता त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांसह कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आली. धुळे शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. योगेश निकम यांनी लोखंडी ग्रीलला प्लास्टिक नळीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, निकम यांच्यावर सुमारे 10 लाखांचे कर्ज होते व ग.स.बँकेनेही त्यांना नोळीस बजावल्यानंतर कर्ज विवंचनेतून त्यांनी ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !