भालोदला महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम


यावल : तालुक्यातील भालोद येथे शनिवारी जन साहस संस्थेच्या वतीने गरिमा सेंटरच्या बालिकांच्या सहभागात महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात गरीमा सेंटरच्या बालिकांनी सजीव देखाव्यांसह नाटीका सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले.

विविध सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष
भालोद या गावात शनिवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रात बालिकांनी सजीव देखावे सादर करीत देशासाठी व समाजा करीता स्वत:हाच्या जीवनाची आहूती देणार्‍या थोर महिलांच्या सजीव भूमिका साकारल्या तर जनजागृतीपर तसेच कर्तृत्ववान महिलांचे कार्य सादर करणार्‍या नाटीका सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे आयोजन जन साहस संस्थेच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमात गरीमा सेंटरच्या बालिकांनी सुंदर सादरीकरण केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी भालोद उपसरपंच कामिनी जावळे, आशा वर्कर कविता कोळी, शैला भालेराव, सुरेखा जावळे, नंदा बडगुजर, चंद्रकला कोळी, सविता देखमुख, ग्राम पंचायत सदस्य नंदा पाटील, दिनेश विशाखा, मंजू रील, दरम्यान, या कार्यक्रमात महिला दिनाचे महत्व नाटीकेच्या माध्यमातून गरीमा सेंटरच्या बालिका तेजस्विनी कोळी, सारीका कोळी, प्रीती भालेराव, पूजा कोळी, अस्मिता कोळी, कांचन भालेराव, कोमल तायडे, नम्रता कोळी, टीना चौधरी, हेमलता सपकाळे, गायत्री कोळी, ममता कोळी, मोहिनी भालेराव, अपुर्वा भालेराव, साक्षी भालेराव, ऋचाली भालेराव, अर्पीता भालेराव, रीतामा कोळी, कशीश पाटील, अश्विनी राझोदे यांनी सुंदर पध्दतीने सादर केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !