यावलच्या विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ : भुसावळातील पतीसह आठ संशयीतांविरोधात गुन्हा
Harassment of married woman of Yaval for two lakhs : Case against eight suspects including husband in Bhusawal
यावल : शहरातील नगीना चौक खिर्णीपुरा भागातील माहेर असलेल्या 20 वर्षीय विवाहितेने माहेरून दोन लाख न आणल्याने पतीसह माहेरील लोकांनी छळ केला. मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला माहेरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ संशयीतांविरोधात गुन्हा
शहरातील खिर्णीपुरा भागातील माहेर असलेल्या तेहसिन जिया शेख रीजवान (20) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह शेख रीजवान शेख सलीम (अयान कॉलनी, भुसावळ) यांच्याशी सोमवार, 6 मार्च 2022 रोजी झाला होता व लग्नानंतर पती शेख रीजवान शेख सलीम, सासु नईमाबी शेख सलीम, सासरे शेख सलीम शेख शब्बीर, नणंद नाजीयाबी हकीम काझी, माम सासरे हाफिज खान हबीब खान, आसिफ खान हबीब खान, सादिक खान हबीब खान, मावस सासु नजमाबी शेख नबी (सर्व रा.भुसावळ) या आठ जणांनी भुसावळ रेल्वे स्टेशनवर कॅन्टीन उघडायची असल्याने माहेरून दोन लाख रुपये आण असा तगादा लावला. पैसे आणू शकत नाही असे सांगितल्यानंतर त्यांनी त्रास देण्यास सुरवात केली व मुलगा झाल्यानंतर माहेरी सोडून दिले. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.