मुक्ताईनगर नगरपंचायतीत आठ महिन्यांपासून सर्वसाधारण सभेला ‘खो’
प्रभारी नगराध्यक्षांकडून विकासकामांना खोळंबा : शिवसेना नगरसेवकांचा आरोप
मुक्ताईनगर : शहरात अनेक कोटी रुपयांची विकासकामे मंजूर असून राजकीय आकसापोटी सर्वसाधारण सभेचे करण्यात आलेले नाही शिवाय मनमानी कारभार करणार्या प्रभारी नगराध्यक्षांवर कारवाई कारवाई, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे शिवसेना नगरसेवकांनी केली आहे. प्रभारी नगराध्यक्ष राजकीय द्वेषापोटी सर्वसाधारण सभा न घेता शहरातील नागरी समस्यांना बगल देत असल्याचा आरोप प्रसंगी पत्रकार परीषदेत सेनेच्या नगरसेवकांनी केला.
आठ महिन्यांपासून सर्वसाधारण सभेला ‘खो’
पत्रकार परीषदेत नगरसेवक म्हणाले की, मुक्ताईनगर नगरपंचायतीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर शहर अंतर्गत करोडो रुपयांचा निधी रस्ते, गटारी, विविध समजासाठी सामाजिक सभागृहे आदींसाठी दिला आहे. या विकासकामांना खोळंबा व्हावा म्हणून या विकास कामांचे प्रशासकीय पत्रे प्राप्त झाल्यानंतरही प्रभारी नगराध्यक्ष असलेल्या उपनगराध्यक्षा मनीषा पाटील या कुणातरी राजकीय व्यक्तीच्या इशार्याने सर्वसाधारण बैठकीचे आयोजन करीत नाही. या विकास कामांना मुद्दाम आडकाठी आणण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. 1 जून 2022 च्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यानंतर वारंवार तक्रारी निवेदने देवूनही सदरील प्रभारी नगराध्यक्ष सर्व साधारण सभा काढलीच नाही. त्यानंतर त्यांनी 17 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी सर्वसाधारण बैठक आयोजित केली होती. या बैठक अजेंड्यात आमच्या प्रभागातील एकही विकास काम घेतलेले नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना लेखी पत्र देवून त्यांचे घेतलेले विषय पुढच्या सर्वसाधारण अजेंड्यावर घेतांना शहरातील सर्व प्रभागातील विषय आणि विकास कामे मंजूर झालेले प्रशासकीय विषय घेण्याची मागणी करून लेखी कळविले होते परंतु अद्याप पावेतो त्यांनी सर्वसाधारण बैठकीचा अजेंडा काढलेला नाही. जर स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष राजकारण करून पालिका सदस्यांचे विषय न घेता बैठ घेत नसल्यास पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करून विशेष सभा घेता येते व त्याबाबतची मागणी आम्ही जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी पत्रकार परीषदेला राजेंद्र सुकदेव हिवराळे, (गटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 17. मुक्ताईनगर), निलेश प्रभाकर शिरसाट, (गटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 15, मुक्ताईनगर), पियुष भागवत मोरे (गटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 7. मुक्ताईनगर), संतोष प्रल्हाद कोळी (उपगटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 1. मुक्ताईनगर), मुकेशचंद्र कैलास वानखेडे (नगरसेवक प्रभाग क्र.6, मुक्ताईनगर), संतोष सुपडू मराठे, (उपगटनेता, नगरसेवक प्रभाग क्र. 12, मुक्ताईनगर), शबाना बी.अब्दुल आरीफ, (नगरसेवक प्रभाग क्र.2, मुक्ताईनगर), नुसरत बी.महेबूब खान, (नगरसेवक प्रभाग क्र.3. मुक्ताईनगर), सविता सुभाष भलभले, (नगरसेवक प्रभाग क्र.14. मुक्ताईनगर) आदींची उपस्थिती होती.
