गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्षांचे मुक्ताईनगरात स्वागत
Gujarat BJP state president welcomed in Muktainagar मुक्ताईनगर : सावदा येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त आलेले भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सी.आर.पाटील (Gujarat state president of BJP and MP CR Patil) यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती गंगा पाटील यांनी रविवारी खासदार रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता भाजपा कार्यकर्त्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजू भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, डी.एस.चव्हाण, ललित महाजन, जयपाल बोदडे, नजमा तडवी, संतोष खोरखेडे, प्रफुल्ल जवरे, कैलास वंजारी, चंद्रकांत भोलाणे, पंकज कोळी, दत्ता पाटील, अंकुश चौधरी, सचिन पाटील, प्रशांत महाजन, दत्ता जोगी, मोहन महाजन, विनायक पाटील, प्रशांत महाजन, रहस्य महाजन, मयूर महाजन, विजय काठोके, पुरुषोत्तम वंजारी व मुक्ताईनगर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

