भुसावळात रक्तदान जनजागृती यात्रेचे स्वागत
Welcome to Blood Donation Awareness Yatra in Bhusawal भुसावळ : रक्तदानाविषयी अधिकाधिक जनजागृती होण्यासाठी जयदेव राऊत यांनी 25 हजार किलोमीटर अंतर पार करीत कोलकत्त्याहून सायकलद्वारे यात्रा सुरू केली आहे. भुसावळ येथे रविवारी राऊत यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.
देशभरात जनजागृतीचा मानस
1 ऑक्टोबर 2022 रोजी राऊत यांनी कोलकत्ता येथून सायकलद्वारे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण वाढण्यासाठी संपूर्ण देशात सायकलवरून फिरुन जनजागृती सुरू केली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता भुसावळ येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी आणि त्यांचे अभियान यशस्वी होण्यासाठी जीवनदान ब्लड ग्रुप ग्रामीण ग्रुपचे सतीश महाजन, डॉ.राजेश मानवतकर, सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे, धन्वंतरी ब्लड बँकेचे डॉ.प्रवीण महाजन, भुसावळ ब्लड बँकेचे डॉ.महादेव मुळे, अनिल यादव यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.

