भुसावळात तन्वी लेडीज शॉपीसह अनिरुद्ध प्रिंटींग वर्क्सचा थाटात शुभारंभ

आमदार राजूमामा भोळे यांनी फीत कापून प्रतिष्ठानचे केले उद्घाटन


Grand launch of Aniruddha Printing Works with Tanvi Ladies Shop at Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील माऊली प्लाझा संकुलात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी सायंकाळी सहा वाजता तन्वी लेडीज शॉपीसह अनिरुद्ध प्रिंटींग वर्क्सचा आमदार राजू मामा भोळे यांच्याहस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी हभप भागवत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकाच दालनात ग्राहकांना अनेक सुविधा
तन्वी लेडीज शॉपी व जनरल स्टोअर्समध्ये ग्राहकांना कॉस्मेटीक, कटलरी आयटेम, श्रृंगार आयटम्स, महिलांसाठी गाऊन, जेन्टस परफ्यूम, डिओ, गिप्ट, खेळणी, देवीचे कपडे तसेच छोटे हार, मोती हार होलसेल व रीटेल भावात उपलब्ध झाले आहेत शिवाय अनिरुद्ध आर्ट अ‍ॅण्ड ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये डिझाईनिंग, व्हिजिटींग काडृ, डिजिटल बॅनर, पत्रिका, बिलबिक, लेटरहेड वाजवी दरात बनवून मिळणार आहे शिवाय 12 बाय 18 साईजमध्ये तत्काळ प्रिंट उपलब्ध होणार असून मनी ट्रान्सपर, रीजार्च, लाईटबिल भरणा, खाते उघडण्यासह आधारकार्ड मार्फ पैसे काढणे, नवीन पॅनकार्ड तयार करणे, मतदान कार्ड तयार करून दिले जाणार आहे.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शुभारंभप्रसंगी अनिरुद्ध प्रतिष्ठानचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर अंजाळेकर व सौ.रींकू मयूर अंजाळेकर तसेच राजेंद्र दत्तात्रय अंजाळेकर यांच्यासह परीवारातील सदस्यांची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !