भुसावळात मरीमातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या

यंदा काटेकोर नियोजनाने उत्सव शांततेत : व्यावसायीकांनी थाटली दुकाने


In Bhusawal, barrows pulled by Marimata’s cheers भुसावळ : शहरातील जुना सातारा भागात परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्यात आल्या. गतवर्षी घडलेल्या दुर्घटनेनंतर यंदा उत्सव समितीने अत्यंत काटेकोर नियोजन केल्याने निर्विघ्न उत्सव पार पडला. बारागाड्यांच्या मार्गावर यंदा गुरुव्दारा ते सतारे चौकापर्यंत रस्त्यावर बॅरीकेटींग करण्यात आले व एकेरी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला शिवाय शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त राखल्याने निर्विघ्नपणे उत्सव पार पडला.

नोंदणीकृत स्वयंसेवकांनाच बैलगाड्यांवर प्रवेश
यंदाच्या यात्रोत्सवात भगत देवेंद्र सपकाळे (देवू) यांनी बारागाड्या ओढल्या तर बगल्या म्हणून मयुर भोळे व दुर्गेश पाटील यांनी सहकार्य केले. यंदा ओढण्यात आलेल्या बारागाड्यांवर केवळ नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांनाच बसण्याची संधी मिळाल्याने अनावश्यक गर्दी कमी झाली शिवाय नोंदणीकृत स्वयंसेवकाला टी शर्ट वितरीत करण्यात आल्याने ओळख पटवणे सहज शक्य झाल्याने अन्य जमावाला बारागाड्यांवर बसणे अशक्य झाले शिवाय तीन ठिकाणी पोलीस व स्वयंसेवक बूथ उभारण्यात आल्यानंतर 125 दिवे समितीसह पालिकेने लावल्याने उत्सवात कुठलाही अडथळा आला नाही.

यात्रोत्सवातून मोठी उलाढाल
मरीमाता यात्रोत्सवाच्या माध्यमातून विविध हॉटेल्ससह कटलरी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती शिवाय अन्य दुकानेही थाटण्यात आल्याने या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. रात्री उशिरापर्यंत यात्रोत्सवाचा उत्साह कायम होता. यात्रोत्सवामुळे वाय पॉईंटकडून भुसावळकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली होती शिवाय वाहनधारकांनी अन्य पर्यायी मार्गाने यावलकडे प्रयाण केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !