आमदारांच्या नावाने प्रश्न न मांडण्यासाठी मागितली लाच : दोघांना अटक
नागपूर : विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकार्याकडे क कोटींची लाच मागत तडजोडीअंती 25 लाख स्वीकारताच एसीबीने मुसक्या आवळलया. लाच घेताना पकडण्यात आलेला एक आरोपी एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञ असून दुसरा राजकीय कार्यकर्ता आहे. तक्रारदार अधिकारी ‘आरटीओ’तील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाच स्वीकारताच अटक
विधान परीषदेतील आमदार वजाहत मिर्झा विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता मात्र हाच मुद्दा पकडून एमआयडीसी-अमरावती येथील टेक्निशिअन दिलीप वामनराव खोडे (50, हिरानंदानी मिडोज, ठाणे पश्चिम) व शेखर भोयर (अमरावती) या दोघांनी तक्रारदार अधिकार्याशी संपर्क केला. आपण आ.मिर्झा यांच्या जवळचे असून विधानपरिषदेत यापुढे हा प्रश्न उपस्थित होणार नाही व तक्रारीवर कुठलीही कारवाई न होता मुद्दा परस्पर मिटवला जाईल, अशी बतावणी करत दोन्ही प्रकरणांचे प्रत्येकी 50 लाख असे एकूण एक कोटी रुपये मागण्यात आले. ही रक्कम फार जास्त होत असल्याचे म्हणत अधिकार्याने हात वर केले मात्र दोन्ही आरोपींनी 25 लाख रुपयांत प्रकरण निपटविण्याची तयारी दाखविली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित अधिकार्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

