हाडाखेड चेक पोस्टजवळ मोठी कारवाई : 12 लाखांची तंबाखू शिरपूर पोलिसांकडून जप्त


Major operation near Hadakhed check post: Tobacco worth 12 lakhs seized by Shirpur police शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड आरटीओ चेक पोस्टजवळ शिरपूर तालुका पोलिसांनी 12 लाखांची सुगंधी तंबाखू जप्त करीत एकाविरोधात गुन्हा दाखल केला. शिरपुर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांनी गोपनीय माहितीद्वारे आयशर (क्र. एच.आर.55 ए. एल.0526)मधून 12 लाखांची सुगंधीत तंबाखू जप्त केली. या प्रकरणी सुशीकुमार अयोध्या प्रसाद याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 लाख रुपयांची आयशर व 12 लाखांची सुगंधीत तंबाखू असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, संदीप पाटील, संदीप ठाकरे, संतोष पाटील, योगेश मोरे, रणजीत वळवी, चालक मनोज पाटील यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !