मोदी सरकारचा भ्रष्टाचार बाहेर न येण्यासाठी राहुल गांधींवर कारवाई
भुसावळात काँग्रेस पदाधिकार्यांचा पत्रकार परीषदेत दावा : भाजपा सरकारवर चौफेर टिका
भुसावळ : मोदी सरकारचा अतिरेक वाढला असून देशातील वाढत्या भ्रष्टाचाराकडे जनतेने दुर्लक्ष करावे म्हणून संसदेतील राहुल गांधीचा आवाज दाबण्यात आला व त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप काँग्रेस पदाधिकार्यांनी शहरात आयोजित पत्रकार परीषदेत केला. शहरातील हितवर्धिनी सभागृहात आयोजित पत्रकार परीषदेत पदाधिकार्यांनी भाजपा सरकारवर टिकेचे बाण चालवले.
भाजपा सरकारकडून सूड भावनेतून कारवाई
देशात भाजपाची सत्ता असून सरकारने विरोधकांना संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचून हिंदू राष्ट्राची वल्गना करून वाटेल त्या लोकांवर व विरोधी पक्षांच्या नेत्यावर अत्याचार सुरू केले आहेत. ईडी, ईसीपी अशा वेगवेगळ्या संस्थांच्या दुरुपयोग करून विरोधकांना जेरीस आणण्यासाठी केला जात आहे तर दुसरीकडे धनदांडग्यांनी घेतलेले मोठ-मोठे कर्ज भाजपा सरकारच्या आदेशाने बँकेने माफ केले असून यामुळे बँका डबघाईला आल्या आहेत. विविध धोरणे राबवून लोकशाहीचा खून केला जात आहे. बीजेपी सरकार मनमानी करीत असून सूड भावनेच्या राजकारणामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. यासाठी जनतेच्या हितासाठी काँग्रेसची लढाई सुरू राहणार असल्याचेही माजी आमदार नीळकंठ फालक म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी निरीक्षक व गटनेते प्रभाकर सोनवणे यावल, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुनव्वर खान, शहराध्यक्ष रवींद्र निकम, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू डोंगरदिवे, प्रदेश समन्वयक भगवान मेढे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम गवळी, तालुकाध्यक्ष शैलेश बोदवडे, प्रदेश सचिव युथ काँग्रेस इमरान खान, सेवादलाचे शहराध्यक्ष संजय खडसे, शैलेश अहिरे, शैलेंद्र नन्नवरे, हमीद शेख, अशफाक काजी, जॉनी गवळी, सुरेश थेटे, अजगर शेख कादर, सागर वानखेड़े उपस्थित होते.
