तीन लाख रुपये न आणल्याने डांभूर्णीतील विवाहितेचा छळ : नरवाडेतील पतीसह चौघांविरोधात गुन्हा


 

 

Harassment of married couple in Dambhurni for three lakhs : Crime against four यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील माहेर असलेल्या 25 वर्षीय विवाहितेचा माहेरून तीन लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला तसेच मारहाण करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह चौघांविरोधात गुन्हा
डांभूर्णी येथील माहेर असलेल्या काजल गणेश धनगर (25) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह नरवाडे, ता.चोपडा येथील गणेश गुलाब धनगर यांच्यासोबत झाला. विवाहानंतर पती गणेश गुलाब धनगर, सासु उषा गुलाब धनगर, सासरे गुलाब शंकर धनगर व दिर शाम गुलाब धनगर (सर्व रा.नरवाडे, ता.चोपडा) या चौघांनी माहेरून तीन लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ केला. पतीने दारूच्या नशेत शिवीगाळ केली मारहाण केली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !