सावधान ! कोरोना संपलेला नाही : 24 तासात 926 रुग्ण ; तिघांचा मृत्यू


Beware! Corona is not over : 926 patients in 24 hours ; Three deaths मुंबई : कोरोना बर्‍यापैकी नियंत्रणात आल्यानंतर आता पुन्हा कोरोनो पाय पसरू लागल्याने नागरीकांची चिंता वाढली आहे. देशात 24 तासात सहा हजार कोरोना रुग्ण आढळले तर महाराष्ट्रात मात्र 24 तासात 926 रुग्ण आढळले असून त्यातील तिघांचा मृत्यू ओढवला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा चिंता वाढवणार असून आरोग्य यंत्रणेने नागरीकांना गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

रुग्ण संख्या वाढली
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यातच महाराष्ट्रातील आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 926 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चिंतादायक गोष्ट म्हणजे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार 487 इतकी झाली आहे.





यंत्रणा अलर्ट मोडवर
गेल्या 24 तासांत राज्यात 423 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्याचा रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 98.12 टक्के इतकं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आली आहे. तर केंद्रीय आरोग्य सचिवालयानंही राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

देशात सहा हजारांवर रुग्ण
दुसरीकडे देशातील रुग्णांची संख्या 6 हजाराच्या वर पोहोचली आहे. गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा आज आढळून आलेले रुग्ण 13 टक्क्यांनी अधिक आहेत. तर देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 28 हजाराच्या वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला कोरोना रुग्णांची संख्या 6,298 होती. आजची आकडेवारी गेल्या 203 दिवसांपेक्षा अधिक आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !